तीन स्वप्निल आदर्शवादी आणि त्यांची आदर्श नगरे
एबक्झर हॉवर्ड व्यवसायाने कारकून असणारे एबक्झर हॉवर्ड हे तसे सामान्य गृहस्थ, पण त्यांच्या ‘गार्डन सिटी’ या आदर्शवादी नगररचनेच्या संकल्पनेच्या सहाय्याने त्यांनी खरे तर जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यांच्या या उद्याननगराच्या कल्पनेला सामाजिक सुधारकांच्या गटाने तर उचलून धरलेच, पण त्यामुळे नागरी नियोजनाचे आयामच मुळी बदलून गेले. औद्योगिक शहरांच्या गर्दी, गोंधळ, काजळी ह्यांनी भरलेल्या १९ या शतकातील …